आज पहिला पाऊस पडला. मी दुपारच्या जेवणानंतर बेडरूम मध्ये जाऊन झोपलो होतो. रोझच्या सारखच वातावरण होत. पाऊस पडेल अशी शक्यता मनातच आली नव्हती. दुपारचे २:३० वाजले होते. रोझच्या सारखीच कंटाळवाणी दुपार... आणि त्यावर दुपारच्या वेळेस कॉलोनितली मुले चांगलाच कल्लोळ करत क्रिकेट खेळत होती. डोकं चांगलच उठून आल होत. पण डोळ्यांवर चांगलीच झोप आली होती. आजचा दिवस सुद्धा वाया जाणार असच वाटत होत. आणि मग तो पाऊस आला. मी ताबडतोब, डगमगत उठलो. घराच्या सर्व खिडक्या बंद केल्या. आणि मग ढग गडगडले आणि तो चांगलच जोरात पडू लागला. मी खिडकी उघडून हाथ बाहेर काढला आणि त्या पहिल्या पावसाला स्पर्श केला. मी तो पाण्याचा हाथ आत घेतला आणि माझ्या डाव्या हातावर तो फिरवला. पावसाच्या पाण्याच्या स्पर्शात आणि नळाच्या पाण्याच्या स्पर्शात किती वेगळेपण आहे, हे मला तेव्हा जाणवले. वातावरण बदल्ल हात. हवेत गारवा होता. एकच खंत वाटत होती... तो मावळता सुर्य नाही बघता आला. तो, नाहीसाच झाला होता. ढगांपुढे! पण आकाशात मात्र रंगांची जादू तशीच होती. उलट ही जादुगिरी आणखीनच बहरली होती.
No comments:
Post a Comment