Tuesday, 27 December 2016

उत्तराखंडात.. गंगे किनारी.

हा छोटू एकटाच उसाचे दुकान सांभाळत होता. हा माझा गंगे किनारी काढलेला पहिला फोटो.









a boy taking dip in ganga..






ह्या तिघांचा फोटो काढताना मला खूप मजा वाटली. पाण्यातून चालतासताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं थ्रिल मी कॅप्चर केले आहे असे मला वाटते.. 




Taare Zameen Par :)







मी पुलावरून फोटो काढत असताना हा माझ्या जवळ येऊन थांबला आणि मी काय करतोय हे पाहत होता. माझं त्याच्याकडे लक्ष्य जातास मी त्याचा फोटो काढला. 












Sunday, 4 December 2016

उत्तराखंडात.. corbett national park.

Jim Corbett National Park चा अनुभव खुपच मस्त होता. आमच्या ड्रायव्हरने तर चक्क एके ठिकाणी जीप थांबवली आणि आम्ही उतरून काही वेळ टायगर डोंगराच्या पायथ्याशी पाणी पिण्यासाठी येतो कि नाही हे पाहत उभे होतो. मी जंगल हे ह्यापूर्वी अश्या प्रकारे कधीच अनुभवले नव्हते. 








आम्हाला टायगर तर दिसला नाही पण त्याने केलेले हे निशाण पाहता आले.


सफारीच्या शेवटी आम्ही चहा पिण्यास थांबलो.


रस्त्याच्या कडेला एक माकड बसले होते. आमच्या ड्रायव्हरने त्याच्यापाशी गाडी थांबवली आणि म्हणाला.. "ये बंदर देखिये, ये बहुत शांत स्वभावके है क्यूकी ये जंगल के बंदर है. इन्का इन्सानोके साथ इतना संपर्क नाही है, इसलिये ये शांत स्वभाव के है." 



आम्ही ज्या रिसॉर्ट मध्ये थांबलो होतो त्याचे हे मालक. त्यांनी आम्हाला सांगितले कि ते रिटायर झाल्यावर ते घरी बसले नाही.. तर त्यांनी त्यांचा सर्व पयसा हे रिसॉर्ट उभारण्यात लावला आणि हा बिझनेस सुरु केला.