Friday, 15 April 2016

उत्तराखंडात.. The first photographs!

उत्तराखंडात पहिला stop आम्ही घेतला तो एका देवीच्या मंदिरात. देवीचे दर्शन झाल्यावर मी देवळा बाहेर काही फोटो काढले. उत्तराखंडात सतत घाट चा प्रवास असल्यामुळे थोडा वेळ कुठे थांबलो कि बरे वाटायचे. मंदिराच्या परिसरात सुंदर पक्षी बघायला मिळाले!



देवळाच्या परिसरात काही दुकाने होती. एक चहावाला होता.. मग आम्ही चहा पिण्यासाठी आणखी काही वेळ थांबलो. चहा घेत असताना मी काही फोटो काढले.







चहा झाल्यावर मी थोडा पुढे चालत गेलो आणि मला एक दुकान दिसले. दोन मुलं ते दुकान सांभाळत होती. मी उत्तराखंडात बरीच मुले एकटी दुकानं सांभाळताना बघितली. कदाचित त्यांचे vacations चालू असतील आणि म्हणूनच आपल्या आई-वडिलांना थोडी मदत म्हणून ते दुकान बघत असतील. असो... 
सगळे business मध्ये चांगलेच रमतील अस वाटतं.
त्या दोघांचा मी फोटो काढला.. हा माझा आवडता असा फोटो, titled- "two boys manning the shop".



Wednesday, 6 April 2016

मी.

मी आहे पाण्यासारखा. ज्याच्यात मिसळतो तसाच होतो. पण खरा मी मत्स्य सारखा.. कधी इकडे तर कधी तिकडे. मनाला शांतता नाही, स्थिरता नाही.
पाणीहि मीच आणि मिनही मीच!